नाशिक दिनकर गायकवाड राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या संकल्पनेतून पेठ तालुक्यातील करंजाळी गणातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर नरहरी झिरवाळ यांनी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ग्रामीण व दुर्गम भागात ज्ञानार्जन करणाऱ्या मुलांना दप्तर, वही, पाटी, पेन आदी साहित्य वाटप केले. यावेळी युवा नेते गोकुळ झिरवाळ, हिरामण पवार,
पुंडलिक सहारे, मोहन गावंढे, गणेश गवळी, शामराव गावंडे, उस्थळे येथील सरपंच चंद्रकला भुसारे, पोलीसपाटील सुनीता राऊत, जनार्दन भुसारे, विठ्ठल भुसारे, गोवर्धन गावंडे, रूपाली गांगोडे, रोहिणी गावंडे, दिलीप राऊत, जगन भुसारे, भास्कर अवतार, निवृत्ती सापटे, बाळू गवळी, सरपंच दुर्गनाथ गवळी, निवृत्ती वाघमारे, मनोज भोये, प्रवीण गवळी, हेमराज गवळी, सुरेश गवळी, हेमंत गवळी, अजिंक्य भुसारे,मुन्ना राऊत, रवी भोये, महादू गहिले आदी कार्यकर्ते व ग्रुप ग्रामपंचायत उस्थळे येथील ग्रामस्थ,शिक्षक उपस्थित होते.