नाशिक दिनकर गायकवाड भरधाव वाहनचालकाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना महामार्गावर घडली.
याबाबत पोलीस शिपाई दिपक जगताप यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले, की मंगेश माधव नगरकर (वय ३८, रा. तुळजाभवानी चौक, सिङको) हे त्यांच्या ताब्यातील एमएच १५ डीपी ३७४६ या क्रमांकाच्या मोटार सायकलीने मुंबई-आग्रा रोडने विल्होळीकडून नाशिककडे ओव्हर ब्रिजवरून येत होते.
हॉटेल गेटवेसमोर एका अज्ञात वाहनचालकाने नगरकर यांच्या मोटारसायकलीस पाठीमागून जोराची धडक दिली. त्यात नगरकर यांना गंभीर दुखापत होऊन ते ठार झाले. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाच्या विरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून,याबाबत पुढील तपास पोलीस हवालदार झोले करीत आहेत.
