नाशिक दिनकर गायकवाड सीएसआर उपक्रमातून विद्यार्थ्यांना आधुनिक प्रयोगशाळा साहित्याची देणगी असल्याचे प्रतिपादन मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी दिंडोरी येथे केले.
मविप्रच्या माजी विद्यार्थी संघाच्या उपक्रमातून, जिल्ह्यातील विविध कंपन्यांच्या सीएसआर निधीतून शाळांना शैक्षणिक साहित्य वितरण सुरू आहे.त्याच उपक्रमांतर्गत जनता इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय, दिंडोरी येथे मेगाफाईन कंपनीच्या वतीने विज्ञान प्रयोगशाळेसाठी सुमारे २ लाख ५० हजार रुपयांचे प्रयोगशाळा साहित्य व अभिनवच्या लहान मुलांना ७० हजार रुपयांच्या खेळणीचे साहित्य देण्यात आले. त्यावेळी ॲड. ठाकरे बोलत होते.ॲड.ठाकरे म्हणाले की, आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी प्रयोगशीलता व कौशल्यावर भर दिला पाहिजे.
विज्ञानाचा उपयोग शेती, उद्योग व जीवनमान सुधारण्यासाठी करायला हवा. नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रात्यक्षिक आधारित शिक्षण आवश्यक आहे. त्यांनी आयडिया बॉक्समधून पुरस्कारप्राप्त वैष्णवीचेही कौतुक केले. साहित्य प्रदर्शन व उद्घाटन मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे व कंपनीच्या उपविभाग व्यवस्थापक हे दीपाली बायजू यांच्या हस्ते झाले. प्रास्ताविक प्राचार्य शरद शेजवळ
प्रयोगशाळा उद्घाटन सहका म.वि.प्र. माजी विद्यार्थी संधाचा उप यांनी केले. मेगाफाईन कंपनीच्या दीपाली बायजू यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित करत शिक्षणात सातत्य ठेवण्याचा सल्ला दिला.
कार्यक्रमाला ज्येष्ठ सभासद दौलत उखर्डे, माजी प्राचार्य सुरेश पाटील, एस. डी.कदम, विठोबा कदम, मंगेश कदम, बाबा मोरे, सीनिअर कॉलेजचे प्राचार्य मेधने, प्राचार्य शरद शेजवळ, उपप्राचार्य यू. डी. भरसट, पर्यवेक्षक रावसाहेब उशीर, यशवंत दाणी यांच्यासह विज्ञान शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.