नाशिक दिनकर गायकवाड- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती निमित्त भारतीय जनता पार्टी, कामगार मोर्चा नाशिक जिल्हा यांच्याकडून राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर माहितीपर चित्ररथ व चित्रफीत तयार करून शहरांमध्ये विविध ठिकाणी दाखविण्यात आली. राजमातांची माहिती व त्यांनी केलेल्या कार्याबाबत नागरिकांमध्ये जागृती करण्यात आली.
भाजपा कामगार मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.तुषार जगताप, भाजपा कामगार मोर्चा उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस व्यंकटेश मोरे, भाजपा कामगार मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राहुल आरोटे, तसेच कामगार मोर्चा शहराध्यक्ष हेमंत नेहेते यांच्या प्रयत्नांतून राजमातांचे कार्य जनमानसात पोहोचविले गेले. यास नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
