स्व.शंकरराव घुले गुणवंत कामगार पुरस्कार वितरण

Cityline Media
0
                                                                क्रांतीदीप कॉ.बाबा आरगडे गौरव ग्रंथाचे  प्रकाशन

अहिल्यानगर : “स्व.शंकरराव घुले गुणवंत कामगार पुरस्कार वितरण  व  हमाल पंचायतचे जेष्ठ मार्दर्शक,शब्दगंध चे मार्गदर्शक कॉ.बाबा आरगडे यांच्या बद्दल सर्वांनी मिळून लिहिलेल्या  " क्रांतीदीप : कॉ.बाबा आरगडे गौरव ग्रंथ " चे प्रकाशन  आमदार संग्राम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली,पदमश्री पोपट पवार यांच्या हस्ते गुरुवार दिनांक  १२ जुन २०२५ रोजी स.११ वा.हमाल पंचायत,मार्केट यार्ड,अहिल्यानगर येथे होणार आहे.” अशी माहिती हमाल पंचायत चे जिल्हाध्यक्ष अविनाश घुले यांनी दिली.
गेल्या काही वर्षापासून  स्व.शंकरराव घुले यांच्या नावाने गुणवंत कामगार पुरस्कार देण्यात येतात, त्याचे वितरण  यावेळी होणार आहे.तसेच सुनील गोसावी यांनी संपादित केलेल्या  “ क्रांतीदीप : कॉ.बाबा आरगडे गौरव ग्रंथ “ चे प्रकाशन होणार असून  मध्ये डॉ.भालचंद्र कांगो, ॲड सुभाष लांडे , 

राजेंद्र उदागे, कॉ.का वा शिरसाठ,ज्ञानदेव पांडुळे, डॉ. करणसिंह घुले, डॉ.निर्मला लुने, प्राचार्य डॉ.अशोक ढगे, राजेंद्र फंड, बी.के. चव्हाण, शशिकांत गायकवाड, चंद्रकला आरगडे, कॉ.एल.एम.डांगे, सुभाष सोनवणे,भाऊसाहेब सावंत, कॉ. भगवान गायकवाड, रामकृष्ण नवले, कारभारी गरड, कैलास जाधव, ज्ञानदेव उंडे, शहाराम आगळे, बाळासाहेब आरगडे व सुनील गोसावी यांनी कॉ.बाबा आरगडे यांची घेतलेली  मुलाखत इत्यादींचा समावेश आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती, हमाल पंचायत, रिक्षा पंचायत, जीप चालक वाहक संघटना, भारतीय कम्युनिस्ट पक्ष यासह विविध संस्था व संघटनांमध्ये मार्गदर्शकाच्या भूमिकेत असलेले कॉ. बाबा आरगडे वयाच्या ८० व्या वर्षाकडे पदार्पण करत आहेत, त्यानिमित्त हा गौरव ग्रंथ प्रकाशित करण्यात येत आहे.

हमाल पंचायत, मार्केट यार्ड, अहिल्यानगर या ठिकाणी होत असलेल्या कार्यक्रमास  सर्वांनी उपस्थित रहावे,असे आवाहन हमाल पंचायत चे जिल्हाध्यक्ष अविनाश घुले, शब्दगंध साहित्यिक परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, सचिव सुनील गोसावी, कार्याध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे, भगवान राऊत यांनी केले आहे.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!