राहता तालुक्यातील नुकसानाची माहिती घेत शेतकऱ्यांशी साधला संवाद.
श्रीरामपूर दिपक कदम राहता तालुक्यात शनिवारी अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली होती.यामध्ये वाऱ्याचा वेग प्रचंड असल्यानं तिसगाव, राजुरी, बाभळेश्वर यांसह अनेक ठिकाणी झाडे पडली.तर काही शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच डाळिंब बागांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
आज सकाळी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली! बाभळेश्वर येथील भाऊसाहेब म्हस्के यांच्या कांद्याची चाळ तसेच राजुरी - पिंपरी रोड लगत असलेल्या राहुल कसाब यांचे झालेले डाळिंब बागाचे नुकसान, राजुरी येथील प्रसिद्ध डाळिंब उत्पादक बी.टी गोरे यांची डाळिंब बाग, राजुरी येथील यशवंतराव चव्हाण विद्यालय याठिकाणी झाडे पडून झालेले नुकसान अशा अनेक ठिकाणी जात नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून त्यांच्याशी संवाद साधून नुकसानाची माहिती पालकमंत्री विखे यांनी घेतली. यावेळी मोठ्या संख्येने अधिकारी वर्ग उपस्थित होता.
