नाशिक दिनकर गायकवाड पामतेलाच्या ५०९१ डब्यांपैकी ४११ डब्यांची डिलिव्हरी करून उर्वरित पावणेदोन लाख रुपयांचे तेलाचे १० डबे ट्रान्स्पोर्ट मालकास परत न करता त्यांचा अपहार केल्याप्रकरणी खोपोलीच्या ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी रामबंद शांताराम पवार (रा. खोपोली, ता. खालापूर, जि. रायगड) यांच्या मालकीची शिळफाटा येथे सागर ट्रान्स्पोर्ट नावाची फर्म आहे. पवार यांनी दि. १४ जून रोजी सकाळी स्यांच्या मालकीचा एमएच १४ एचजी ५०६० या क्रमांकाच्या टेम्पोवरील चालक आरोपी अनित भागूराम वाघमारे (रा. काजूवाडी, खोपोली) याला अलाना कंपनीत सारत्तन खोपोली येथून २० लाख ४६ हजार ७५ रुपये किमारीच्या तेलाच्या मालाची डिलिव्हरी
करण्यासाठी नाशिक येथे पाठविले होते. त्यानंतर दि. १३ जून रोजी पंचवटी मार्केट याहांमधील श्रीराम ट्रेडर्स येथे एकूण ५०१ तेलाच्या पत्र्याच्या डब्यांपैकी ४११ तेलाचे हमे श्रीराम ट्रेडर्सच्या संघालकांनी उतरवून घेतले; मात्र उर्वरित ९० तेलाच्या चेपलेल्या हस्यांची माहिती श्रीराम ट्रेडर्सचे मालक महेश उवकर यांनी फिर्यादी रामबंद्र पवार यांना कळविली.
ते डबे परत करून तही पावतीवर नोंद केली. त्याप्रमाणे कंपनीत है डबे परत पाठवीत असल्याचे फिर्यादींना कळवून माल चातक वाघमारे याच्या गाम्यात दिला. त्यानंतर दि. १४ जून रोजी पंचवटी वेथून परत खोपोली येथे येत असताना ते १२ च्या सुमारास चालक अनिल वाघमारे याच्याकडे सोपविलेला माल त्याने खोपोली येथे परत न आता त्याचा परस्पर कसारा घाट परिसरात अपहार करून स्थायी विक्री केली. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात चालक अनिल वाघमारे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हारहाण करत आहे