लोणी दिपक कदम लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने ११वा जागतिक योग दिन अत्यंत उत्साहात आणि ४० हजारांहून अधिक जणांच्या सहभागातून व्यापक स्वरूपात साजरा करण्यात आला.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त या विविध उपक्रमांमध्ये संस्थेचे सुमारे ४०,००० हून अधिक विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच विविध गावांतील नागरिकांनी एकत्र येत योग दिनात सहभाग नोंदवला. यावेळी योगसाधना करत संपूर्ण परिसरात सर्वांनी एक सकारात्मक ऊर्जा अनुभवली !
योग साधनेच्या माध्यमातून भारताने जगाला अमूल्य ठेवा दिला असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने जागतिक योग दिन जगभरात साजरा केला जातोय.आरोग्य, मनःशांती आणि एकाग्रतेसाठी योगाचे महत्त्व अनन्य साधारण आहे.
