बालविवाहाप्रकरणी नातेवाईकांसह लॉन्समालक, भटजीविरुद्ध गुन्हा
नाशिक दिनकर गायकवाड वधू ही अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही तिचा बालविवाह लावून दिल्याप्रकरणी नातेवाईकांसह लॉन्समालक व भटजी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक मयुरी तुपे यांनी फिर्याद दिली आहे.त्यात म्हटले, की वर बालक हा १९ वर्षांचा, तर वधू बालिका १६ वर्षे ११ महिन्यांची असून, त्यांचा विवाह दि. २३ मे रोजी नाशिक रोड येथील श्रीहरी लॉन्स येथे झाला.
यावेळी आरोपी नागेश पवार, लक्ष्मी पवार (दोघेही रा. बोरगड म्हसरूळ, नाशिक), मीनाक्षी शिंदे, पंडित शिंदे (दोघेही रा. नाशिकरोड, तसेब लॉन्सचे मालक व लग्र लावून देणारे भटजी यांना वर व वधू हे बालक हे अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही त्यांनी हा बालविवाह लावून देत बालविवाह प्रतिबंधक अधिनियम कायद्याचे उल्लंघन केले.
ही बाब लक्षात आल्यानंतर याप्रकरणी प्रथम म्हसरूळ पोलीस ठाण्यात बालविवाह प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा नंतर उपनगर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बर्वे करीत आहेत.