नाशिक दिनकर गायकवाड माय मराठी,मी मराठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेया विजय असो राज ठाकरे झिंदाबाद मराठी भाषेचा विजय असो..एकच ब्रँड ठाकरे ब्रँड असा विविध घोषणा देत, ढोल ल ताशांच्या गजरात पेढे वाटत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी व कार्यकत्यांनी मराठी भाषेचा विजयोत्सव साजरा केला.
त्र्यंबक रोड येथील राजगड या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मध्यवर्ती कार्यालयासमोर कार्यकत्यांनी हा विजयोत्सव साजरा केला,राज्य सरकारच्या त्रिभाषेच्या हिंदी भाषेच्या सक्ती विरोधात ठाकरे बंधुंनी पुकारलेल्या आंदोलनाला यश आले असून राज्य शासनाने या धसका घेऊन हिंदी भाषेच्या सक्तीचा आदेश अखेर रद्द केला, असे मत यावेळी मनसैनिकांनी व्यक्त केले. हा. मराठी भाषेचा विजय झाला असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.
यावेळी प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांनी बोलतांना हा विजय मराठी अस्मितेचा असून राज ठाकरे यांनी केलेल्या राज्य सरकारच्या अनाठाई निर्णयाला विरोधाचा हा विजय असल्याचे सांगितले. दि. ५ जुलै रोजी होणाऱ्या मोर्चाला यश मिळेल हे राज्य सरकारच्या लक्षात आल्याने हिंदी सतीची अधिसूचना. रद्द करावा लागली या पुढे जेव्हा जेव्हा मराठी भाषेता,मराठी माणसाला गृहीत धरले जाईल,त्या प्रत्येक
वेळी याच पद्धतीने कळवळून विरोध केला जाईल, असे पाटील यांनी ठणकावून सांगितले, याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष सालिम शेख, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, महिला सेना उपाध्यक्ष सुनाता हेरे, जिल्हा उपाध्यक्ष नामदेव पाटील, सत्यम खंडाळे, सर्व विभाग अध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष शहर उपाध्यक्ष, शहर कार्यकारणी पदाधिकारी, महिला सेना, विद्यार्थी सेना अंगीकृत सेना व मनसे सैनिक उपस्थित होते