अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या पुरस्कार सोहळ्यास शरद पवार यांची उपस्थिती
मुंबई सिटीलाईन न्यूज नेटवर्क' अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदे'च्या वतीने दरवर्षी पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवर पत्रकारांच्या पुरस्कार प्रदान सोहळा नुकताच मुंबई येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पाडला. यावेळी त्यांच्या समवेत प्रमुख अतिथी म्हणून डॉ.नरेंद्र जाधव व कार्यक्रमाचे अध्यक्ष एस. एम.जोशी हेही उपस्थित होते.
ह्या सोहळ्यात. मधुकर भावे ह्यांना 'बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्कार' व भरत जाधव ह्यांना 'विशेष सन्मान' देण्यात आला. तसेच. महेश म्हात्रे.अभिजित करांडे,. अमेय तिरोडकर. पांडुरंग पाटील, सर्वोत्तम गावस्कर. दिनेश केळुस्कर, श्रीमती सीमा मराठे,. बाळासाहेब पाटील, श्रीमती शर्मिला कलगुटकर व. भरत निगडे ह्या सर्व मान्यवर पत्रकारांनाही विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.यावेळी सर्व सन्मानित पत्रकार बांधवांचं शरद पवार यांनी मनापासून अभिनंदन केले.
प्रसंगी बोलताना श्री.पवार म्हणाले की खरं! तर माझाही पत्रकारितेच्या क्षेत्राशी काहीअंशी संबंध आला होता आणि आमचा तो प्रयोग यशस्वी झाला असता तर आम्हीही आज 'अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदे'च्या कदाचित सन्मानांना पात्र ठरलो असतो.
कारण स्व.बाळासाहेब ठाकरे, मी आणि आमचे काही मित्र एकत्र येऊन आम्ही एक मासिक काढलं होतं. तेव्हा प्रत्येकाने पाच-पाच हजार रु. गुंतवणूकही केली. इंग्रजीतील 'टाईम' मासिकाच्या धर्तीवर हे मासिक असेल अशी कल्पना होती. पण पहिला अंक प्रसिद्ध केला आणि वाटलं कि तो इतका खपेल कि कुठे दिसणारच नाही. आणि, खरं तर त्यानंतर तो अंक कधी दिसलाच नाही. हा झाला गमतीचा आहे. पण खरंच पत्रकारिता हे क्षेत्र प्रचंड आव्हानांचं क्षेत्र आहे, लोकशाहीत पत्रकारितेला आहे. पत्रकारितेची मूल्य जपत आपण सर्व लोकशाहीत भरीव योगदान देत राहाल, अशी अपेक्षा व्यक्त करत पुरस्कारार्थींचं अभिनंदन केले
