मुंबई सिटीलाईन न्यूज नेटवर्क पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून राज्यात सुरु असलेल्या विकास प्रकल्पांच्या उभारणीसाठी केंद्र सरकारचे संपूर्ण सहकार्य मिळत आहे. राज्याच्या विकासाची ही कामे पुढील शंभर वर्षांचा विचार करुन आखावीत व नियोजित वेळेत पूर्ण करावीत,असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले.
पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून होणारी सर्व कामे दर्जेदार असतील याची काळजी घ्यावी. केंद्रीय अधिकाऱ्यांशी समन्वय, संपर्क ठेवून पंधराव्या वित्त आयोगाचा सर्व निधी वेळेत उपलब्ध होईल आणि चालू आर्थिक वर्षअखेर खर्च होईल, यादृष्टीने कार्यवाही करावी. राज्याच्या विकासासाठी मिळणारा एक रुपयाचा निधीही परत जाणार नाही, याची काळजी घ्या, असे निर्देशही उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी बैठकीत दिले.
