वकीलपत्र नाकारले :न्यायालयाच्या द्वारावर वकिलांकडून निषेध
नाशिक दिनकर गायकवाड माडसांगवी येथे कार्यालयात कामकाज करत असताना ॲड.रामेश्वर बोराडे (वय ३६, रा. शिलापूर) यांच्यावर तिघांनी चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची घटना बुधवारी (दि.३) सायंकाळी घडली होती. संशयित आरोपी श्रुत नवनाथ कुलये (रा. देवळाली गाव) यास अटक करून गुरुवारी (दि.३) जिल्हा न्यायालयात हजर केले.न्यायालयाने सोमवारपर्यंत (दि.७) त्यास पोलिस कोठडी सुनावली. न्यायालयाच्या तिघांनी बोराडे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झाल्यानंतरही बोराडे यांनी पोलिस येई पर्यंत रक्तबंबाळ अवस्थेत शस्त्रधारी कुलथे यास पकडून ठेवले होते. त्याचे दोन्ही साथीदार हे फरार झाले आहेत.
प्रवेशद्वार क्र-१मध्ये मोठ्या संख्येने वकील एकत्र आल्याने दंगल नियंत्रण पथकाला पाचारण केले होते. कुलथे याचे वकीलपत्र कोणीही घेतले नाही.
आडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत माडसांगवी येथे बोराडे यांना मारहाण करत एकाने चाकूने वार करत जखमी केले होते. हा हल्ला सीसीटीव्हीत कैद झाला आणि हे फुटेज वेगाने व्हायरल झाले. यामुळे शहरासह जिल्ह्यातील पोलिसांनी आरोपीला न्यायालयापुढे हजर करण्याची तयारी केल्याचे समजताच प्रवेशद्वारावर वकिलांची गर्दी जमली. सायंकाळी साडेपाच वाजेपासून एक तास गर्दी कायम असल्यामुळे सात वाजता आरोपीला आणण्यात आले.
वकिलांमध्ये संतापाची लाट पसरली. हल्ल्याच्या निषेधार्थ वकिलांनी न्यायालयात एकत्र येत वकील संरक्षण कायदा मंजूर करण्यात यावा, अशी मागणी केली. न्यायाधीशांनी त्यास नाव विचारून कोणाविषयी तक्रार आहे का? असे विचारले आणि पोलिसांना त्यास घेऊन जाण्याचे आदेश दिले. कुलथे याच्याविरुद्ध प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
