आनंदवाडी येथील स्कूल बस अपघात प्रकरण
संगमनेर-प्रतिनिधी शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल बस पलटी झाल्याने चार विद्यार्थी जखमी झाल्याची घटना आज शुक्रवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील चंदनापुरी घाटा जवळील आनंदवाडी परिसरात घडली.या घटनेची माहिती समजताच आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी सौ.नीलम खताळ यांनी तात्काळ डॉ गुंजाळ हॉस्पिटलमध्ये येथे जाऊन जखमी विद्यार्थ्यांची विचारपूस करत त्यांना धीर दिला.तालुक्यातील साकुर पठार भागातील अनेक शालेय विद्यार्थी चंदनापुरी येथील चंदनेश्वर विद्यालयात शिक्षण घेण्यासाठी विद्यालयाच्या स्कूल बसने दररोज येत असतात शुक्रवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास या विद्यालयाची बस (क्रमांक एम एच १४ बी ए ८९३२ )
चंदनापुरी घाटातून आनंदवाडी मार्गे चंदनापुरी येथील चंदनेश्वर विद्यालयाकडे ३५ विद्यार्थ्यांना घेऊन जात होती. आनंदवाडी शिवारातील वळणावर एका वाहन चालकाने ओव्हरटेक करण्याच्या नादात बसचालक यास हुल दिली.बस चालकाने प्रसंगावधान राखत ही बस बाजूला घेतली. ही बस साईड गटारात पलटी झाल्याने बस मधील तीन ते चार विद्यार्थी विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहे.
या अपघाताची माहिती मिळताच आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी सौ.नीलम खताळ ,शिवसेनेचे तालुका प्रमुख रामभाऊ राहाणे ,ग्रामपंचायत सदस्य अंकुश राहणे गुंजाळवाडी पठारचे किरण भागवत किसन सरोदे जनता प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आनंदराव कढणे सचिव अनिल कढणे रामदास पर्बत राहणे विद्यालयाचे प्राचार्य अशोक खेमनर यांनी तात्काळ चंदनापुरी घाटातील डॉ.आर एस गुंजाळ हॉस्पिटल मध्ये भेट देत जखमी विद्यार्थ्यांची विचार पूस करून त्यांना धीर दिला.
