नाशिक दिनकर गायकवाड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची प्रभाग १५ मधील बैठक खा. राजाभाऊ वाजे, शिवसेनेचे उपनेते दत्ताजी गायकवाड, सुनील बागूल, मा. महापौर आ. वसंत गिते, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, विनायक पांडे, सचिन मराठे, बाळासाहेब पाठक, किर्ती निरगुडे, संजय चव्हाण, बाळासाहेब कोकणे आर्दीच्या उपस्थितीत झाली.
बैठकीचे प्रास्ताविक संजय खरे, उपस्थित मान्यवरांचे स्वागत प्रथमेश गिते, राजेश गांगुर्डे व विशाल पवार यांनी केले. यावेळी उपस्थित नागरिकांनी पिण्याचे पाणी व सर्व कॉलनीतील रस्त्यांची दुरवस्था झाल्याचे सांगितले.
आगामी मनपा निवडणुकीत जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू, महानगरपालिकेत भगवा हा फडकणारच, अशी अपेक्षा अनेक वक्त्यांनी यावेळी व्यक्त केली.
बैठकीस पी. डी. काळे, अनंत नागवंशी, संजय वानखेडे, मोरे, रवी सोनवणे, अशोक तेजाळे, नाना तेजाळे, पालेकर, दिलीप चाबूकस्वार, जयराम वाघ, अशोक काठे व संजय मंद, ज्येष्ठ नागरिक व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. पक्षबांधणीच्या बैठकांमुळे आगामी निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळेल, असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला.
