दिंडोरीच्या खतवडला कृषिदूतांचे ‌जोरदार स्वागत

Cityline Media
0


नाशिक दिनकर गायकवाड महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहरी संलग्नित दिंडोरी येथील के. के.वाघ उद्यान विद्या महाविद्यालयातील अंतिम वर्षाचे विद्यार्थी खतवड येथे दाखल झाले आहेत.
यावेळी कृषीदूतांचे सरपंच बबन दोबाडे, उपसरपंच सुखदेव खुर्दळ, ग्रामविकास अधिकारी आर. एच. काथेपुरी यांच्यासह ग्रामस्थांनी स्वागत केले. अंतिम वर्षात ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम व कृषी उद्योग आधारित कार्यक्रम राबविण्यात येत असतात. त्याकरिता विद्यार्थी समूहाला दहा आठवडे गावात शेती संलग्नित व उद्योग संलग्नित नवनवीन उपक्रम व

कार्यक्रम राबविण्यात येत असतात. यामध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यात कृतिशील शेतीचा समावेश होतो व शेतीबद्दल अधिक जागरूकता निर्माण होते असे कृषिदूतांनी सांगितले. समूह प्रमुख संकेत वाकळे, कर्ण जाधव, साक्षांत बनकर व अविष्कार बो-हाडे आदी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे. विद्याथ्यर्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष समीर वाघ, सचिव के एस. बंदी, समन्वयक व्ही. एम. सेवलीकर, प्राचार्य व्ही. एस. संधान, प्रा. पी. एस. बस्ते, प्रा. पी. एस. देवो, प्रा. पी. एम. क्षीरसागर, प्रा. एन. एस. घोगरे, प्रा. व्ही. जे.बजोडे, प्रा.डी. एस. गांगुर्डे यांचे मार्गदर्शन लाभले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!