नाशिक दिनकर गायकवाड जिल्ह्यातील पावसाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या सुरगाणा तालुक्यात मागील काही वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे ऐन खरीप हंगामाच्या प्रारंभीच पाऊस ओढ देत नसल्याने भात व नागलीची लावणी खोळंबली आहे तर भाताची केवळ १.१३ टक्केच लागवड झाल्याने यंदा खरीप उत्पादनावर त्याचा विपरित परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
२०२५ च्या खरीप हंगामात जुलै महिना उजाडला असताना प्रमुख पीक असलेल्या भाताची केवळ
१.१३ टक्के लागवड झाली. अनेक शेतकऱ्यांना महागडी बियाणे खरेदी करून वेळेवर पेरणीही करता आली नाही. त्यामुळे खरीप लागवड लांबणीवर पडली आहे.
सुरगाणा तालुक्यात भात व नागली ही दोन प्रमुख खरिपाची पिके घेतली जातात. तालुक्याची पावसाची सरासरी १८९५ मिमी असतांना यावर्षी जून महिन्यात ४४२.१ मिमी पाऊस झाला आहे. मागील वर्षी जून महिन्यात सुमारे ७०० ते ७५० मिमी पाऊस पडला होता. अंदाजे तालुक्यात सुमारे २७९८८.६६ हेक्टर क्षेत्र खरीप लागवडीखाली येणार आहे.मात्र पावसाने ओढ न दिल्याने भात, नागलीच्या लागवडीवर परिणाम होण्याची धास्ती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.