राष्ट्रपती नियुक्त खासदारपदी निवड झाल्याबद्दल ॲड. उज्वल निकम यांचा जळगावात नागरी सत्कार

Cityline Media
0
जळगाव सिटीलाईन न्यूज नेटवर्क जळगाव जिल्ह्याचे सुपुत्र,देशाच्या न्यायव्यवस्थेत आपल्या कुशलतेने ठसा उमटवणारे आणि कसाब सारख्या कुख्यात दहशतवाद्याला न्यायालयीन लढाईतून फासावर पोहोचवणारे खंदे विशेष सरकारी वकील मा.ॲड.उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा खासदार पदी निवड झाल्याबद्दल जळगावकरांच्या वतीने त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
या गौरव सोहळ्यात जळगाव जिल्ह्याच्या मातीतील सुपुत्राला सन्मानित करत.ॲड.उज्वल निकम यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला.

या प्रसंगी अनेक राजकीय नेते जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना.गिरीश महाजन,पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री.
ना.गुलाब पाटील,पणन व राजशिष्टाचार मंत्री .ना..जयकुमार रावल, वस्त्रोद्योग मंत्री.ना.संजय सावकारे,तसेच जळगाव जिल्ह्यातील सर्व माननीय लोकप्रतिनिधी,विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जळगावच्या मातीतील सुपुत्राच्या यशाचा हा क्षण,संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे अशा भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केल्या

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!