अहिल्यानगर प्रतिनिधी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे भव्य अनावरण नुकतेच येथे उत्साहात पार पडले.
या प्रेरणादायी स्मारकातून आम्ही बाबासाहेबांच्या विचारांना आणि कार्याला विनम्र अभिवादन करत आहोत.याचसोबत शहरात संविधान भवन उभारण्यासाठी १५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे,५ कोटी जिल्हा नियोजन समितीकडून आणि १० कोटी राज्य शासनाकडून.या संकल्पनेचा पाठपुरावा करताना मी ठाम होतो की,बाबासाहेबांच्या विचारांची आणि संविधानाची ओळख पुढच्या पिढीला व्हायलाच हवी असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले या ऐतिहासिक सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण झाले.
प्रसंगी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा., डॉ. सुजय विखे पा. आमदार संग्राम जगताप मा. आमदार लहू कानडे, प्रा.जोगेंद्र कवाडे, भन्ते राहुल बोधी,
जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया,मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे आयुक्त यशवंत डांगे
डॉ. पंकज जावळे, गणेश भोसले,संपत बारस्कर, सुरेश बनसोडे, अशोक गायकवाड, अजय साळवे, सुमेध गायकवाड,परिमल निकम, अक्षय कर्डिले, संजय चोपडा, धनंजय जाधव, मनेष साठे, अविनाश घुले, निखिल वारे, बाळासाहेब पवार, सुनील त्रिंबके आदी अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.