श्रीरामपूर दिपक कदम येथील नगरपालिकेतील न्यायालयाच्या आदेशाने कायम करण्यात आलेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना तातडीने लाडपाती समितीच्या शिफारशीनुसार नोकरीत घेण्यात यावे याकरिता पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे यांना नुकतेच निवेदन देण्यात आले.
श्रीरामपूर नगरपालिकेत न्यायालय आदेशाने कायम झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या एकूण ७० वारसांना नगरपालिकेने अद्यापपर्यंत सेवेत घेतलेले नाही त्याबाबत उच्च न्यायालयात केस प्रलंबित असल्याचे कारण देत संबंधित नियुक्त्या नाकारलेल्या होत्या. परंतु शासनाने सन २००३ मध्ये प्रकाशित शासन निर्णयामुळे नगरपालिकेची न्यायालयातील सर्व मुद्दे सद्यस्थितीत गैर लागू असल्याने शासन निर्णयानुसार कार्यवाही करत सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना तातडीने सेवेत घेणे बाबत मागणी अहमदनगर जिल्हा नगरपालिका कामगार कर्मचारी युनियनच्या वतीने करण्यात येऊन निवेदन देण्यात आले.
यावेळी कॉम्रेड जीवन सुरुडे, सुभान पटेल,विजय शेळके, दीपक शेळके, संदीप राखपसरे,नंदा गायकवाड,राजेंद्र बोरकर, संतोष केदारे, आदींसह मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते.