स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव द्या-नवनाथ खोसकर

Cityline Media
0

नाशिक दिनकर गायकवाड आजच्या स्पर्धेच्या युगात जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्ज्वल व्हावे.यासाठी विद्यार्थ्याना शिक्षणाबरोबरच त्यांच्या अंगी असणाऱ्या कलागुणांनाही वाव मिळावा त्यासाठी शिक्षक व पालकांनी योगदान द्यावे,असे आवाहन दिंडोरी तालुक्यातील नाईकवाडी येथील शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवनाथ खोसकर यांनी केले.
येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी खोसकर बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच भारती बदादे होत्या.यावेळी शिक्षक उल्हास जाधव, स्मिता पाटील, प्रशांत चौटे आदींनी माहिती दिली. मेळाव्यास विलास बदादे, सुकदेव खोसकर, लालू गायकवाड, सीताराम गायकवाड, बाळू बेंडकोळी, पुष्पा गायकवाड, राधा टोंगारे, मुख्याध्यापक राजेंद्र शेवाळे आदींसह पालक उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!