विटा रचणीकार संभाजी भोसले यांच्या दाव्याने खळबळ;विटभट्टी मालकावर वेठबिगारीचा गुन्हा दाखल करणार.
गंगापूर प्रतिनिधी तालुक्यातील शिरपूर चौफुली या ठिकाणी अशोक धोंडीबा शिरसे यांच्या मालकीची विटभट्टी आहे अशोक शिरसे व त्यांचे पुत्र.अजय शिरसे हे या गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी विटभट्टी चालवतात त्यांच्याकडे अहिल्यानगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातील वरवंडी या ठिकाणचे.विजय धिगे यांच्या मध्यस्तीतून विटा रचणीकार .संभाजी बाजीराव भोसले.हे कामगार दि ८ जाने. २०२५ रोजी विट भट्टी रचणीसाठी (भटकर) म्हणून कामास गेले होते.परंतु विटभट्टी मालकाने त्यांची आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार श्री. भोसले यांनी माध्यमांकडे केली आहे.
श्री. भोसले यांनी १६ जुन २०२५ पर्यंत या ठिकाणी विटा रचणीचे काम केले.परंतु विटभट्टी बंद झाल्यानंतर नियमाप्रमाणे संपूर्ण कामाच्या वर्षाचा हिशोब गरजेचे असते पण विटभट्टी मालकाने काहीतरी ख्वाड्डा घालून हिशोबाची टाळाटाळ केली आणि म्हणाले आमच्याकडे हिशोबाची पद्धत निराळी आहे.
तुमच्या हिशोबाचे नंतर बघू असे सांगून हिशोबाची टाळाटाळ या पिता पुत्रांनी केली यानंतर संभाजी भोसले वारंवार हिशोबाचा लकडा लावत राहिले राहिले श्री.भोसले यांच्या हिशोब मागणीला कंटाळून करेन ते पंढरपूरच्या वारीसाठी निघून गेले नंतर वारीहून
आल्यानंतर पुन्हा गावातील काही नागरिक यांच्या समवेत इतर काही भटकर मंडळी हिशोबासाठी गेले असता मालक अशोक शिरसे यांनी या संभाजी भोसले भटकरांनी काम व्यवस्थित पूर्ण केले नाही असा खोटा बनाव करून सर्वांची दिशाभूल केली परंतु त्या ठिकाणी
पाहणीस असे लक्षात आले की संभाजी भोसले यांनी आपले काम व्यवस्थित रित्या भट्टी सिझन संपेपर्यंत केले होते तसे यांच्याकडून दैनंदिन नोंद वह्यामध्ये आढळून आले वीट भट्टी चालू झाल्यापासून संपेपर्यंत श्री.भोसले तेथेच होते तरी देखील मालकाची कामाचे पैसे देण्याची मानसिक तयारी दिसून येत नाही.
उलट तेथील नागरिकांनी ठिकाणी विटभट्टी चालकास सांगितले की आपण त्यांचा हिशोब करून द्यावा त्यानंतर त्यांचा हिशोब सुरू असता या विट्भट्टी मालकाकडे ८३,००० रुपये संभाजी भोसले यांना देणे बाकी निघाले ते पैसै विटभट्टी मालक दोन महिन्यांनी संभाजी भोसले यांना देतो असे आश्वासन दिले होते.
परंतु पैसे आपल्याला द्यायचेत असे मालकाच्या लक्षात आल्याने त्यांनी लगेच बनाव करायला सुरुवात केली की मालकाने काही विटा रचणीला मदत केली त्यात ५५ हजार रुपये मजुरी नाहक वजा करत कामगाराच्या माथ्यावर मारण्याचा प्रयत्न केला.
राहिलेल्या पैशाची संभाजी भोसले यांनी मागणी केली असता विटभट्टी मालकाने वेठबिगार म्हणून डांबुन ठेवण्याची धमकी देत धमकावत त्या ठिकाणावर काढून दिले. आता भटकर संभाजी भोसले हे आपण कुणाकडे दाद मागायची या धडपडीत असताना या विट्भट्टी मालकावर फसवणूक आणि वेठबिगाराचा गुन्हा करणार असल्याचे संभाजी भोसले यांनी सांगितले.