नाशिक दिनकर गायकवाड पेठ शहरातील मुख्य वर्दळीच्या चौकात रस्त्याची अक्षरक्षः चाळण झाली आहे. मुळात या रस्त्याची जबाबदारी कुणाची ? हा यक्ष्य प्रश्न निर्माण झाला आहे. हा रस्ता पुर्णतः खड्ड्याने हरवला आहे.
पेठ शहराच्या बाहेरुण हट्टीपाडा पासून २ कि.मी.चा बायपास काढण्यात आला. त्यावरुन वाहतूक सुरू असल्याने वाहनांचा थेट ओघ कमी झालेला असला तरीही जेथे हा रस्ता विभागला गेला.तेथे बायपास व गाव असा निर्देश असलेला फलक नसल्याने येणाऱ्या ओघात
वाहने थेट शहरात प्रवेश केल्यानंतर चालकाला चूक
झाल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या गावातील २
कि. मी. रस्त्याची जबाबदारी नाकारलेली असल्याने या रस्त्याचे दुरुस्ती बाबत संभ्रमित अवस्था निर्माण झाली आहे. या खडड्यात पावसाचे पाणी साचून राहील्याने वाहनाच्या वेगाने लगतचे रहिवाशी,व्यावसायीक,पादचारी गाळमिश्रीत पाणी अंगावर उडत असल्याने हवालदील झाले आहे संबंधित विभागाबद्दल मतदार संताप व्यक्त करत आहे.