समाजातील शोषित वंचित दुर्लक्षित अस्पृश्य समाजाला अगदी पुरातन काळापासून वंचित ठेवण्यात आले होते, आपल्या समाजातील विद्यार्थ्यांसाठी हक्काचे शैक्षणिक संस्था असावी,आपला समाज, बहुजन समाज त्याचबरोबर सर्व विद्यार्थी हा व्यापक विचार करून युगप्रवर्तक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी पिंपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली, यामुळे मुंबई, औरंगाबाद ( छत्रपती संभाजीनगर) या ठिकाणी महाविद्यालय स्थापन करुन अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक सोयी, सुविधा उपलब्ध झाले.याचबरोबर अजून दुसरी महत्त्वाची गोष्ट आज झाली आहे. जे पुणे विद्याचं माहेरघर समजलं जात, येथील पुणे विद्यापीठाला ८ जुलै २०१४ रोजी भारतीय पाहिली मुख्याध्यापिका आणि मुलींना व बहुजन समाजातील सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे म्हणून अत्यंत कष्ट
सोसले,अपूर्व त्याग केला ते सावित्रीमाई फुले यांचे नाव देण्यात आले आणि शैक्षणिक क्षेत्रात फुले दांपत्याने जे कष्ट घेतले त्याला आजच्या दिवशी हा सन्मान मिळाला म्हणून आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा दिवस आहे.कधी काळी ज्या पुणे मधून पेशवाई सुरू झाली, मनुस्मृतीला उजाळा मिळाला त्याच पुण्यात
सावित्रीमाईचे नाव विद्यापीठाला मिळणं म्हणजे एक प्रकारे मनुवाद्याचा पराभव आणि संविधानाचा विजय. हे नामांतर संविधान अनुयायीसाठी कायमस्वरूपी उर्जेचा, प्रेरणादायी स्थान ठरले आहे.
अशोक तुळशीराम भवरे
संविधान प्रचारक/प्रसारक सिडको नांदेड.