डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान सहन करणार नाही! स्वामी स्वरूपानंद उर्फ आनंद दुबे याच्या देशद्रोही कृत्यांचा तीव्र निषेध!भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला समता, स्वातंत्र्य आणि न्यायाची हमी देणारी राज्यघटना दिली. पण आज स्वामी स्वरूपानंद उर्फ आनंद दुबे नावाचा समाजकंटक खोटा इतिहास पसरवून बाबासाहेबांचे योगदान नाकारण्याचा घृणास्पद प्रयत्न करत आहे!
हे थेट संविधानावरील हल्ला आहे आणि देशाच्या एकतेला धोका निर्माण करणारे कृत्य आहे!
आनंद दुबे हा देशद्रोही आणि दंगलखोर आहे!
त्याच्या मागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात असल्याचा संशय आहे. थेट संविधान बदलण्याचा डाव फसला म्हणून आता बाबासाहेबांचे योगदान खोटे ठरवण्याचा कट रचला जात आहे. केंद्र सरकारचे मौन संशयास्पद आहे!
ऑल इंडिया पँथर सेना आणि करोडो भीमसैनिक उद्यापासून देशभरात आंदोलन उभारणार आहेत! जोपर्यंत आनंद दुबेला युएपीए अंतर्गत अटक होत नाही, तोपर्यंत हा लढा थांबणार नाही!
सर्व भारतीयांना आवाहन!
- तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणि बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ न्यायाची मागणी करा!
- या समाजकंटकाला तात्काळ अटक करण्याची मागणी करा! आंदोलने, निदर्शने, मोर्चे यातून भूमिका मांडा!
- खोट्या इतिहासाला ठेचावाच लागेल!
आज खडबडून जागे व्हा!
जर आपण आता उठलो नाही, तर अशा प्रवृत्ती बाबासाहेबांचे योगदान पुसण्याचा प्रयत्न करतील. भीमसैनिकांनो, बंड करा! समाजकंटक आनंद दुबेला अटक होईपर्यंत जन आंदोलन चालू ठेवा!