नाशिक प्रतिनिधी येथील आदिवासी विभागामध्ये अनेक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्षानुवर्षे अत्यंत कमी रोजंदारीवर काम करतात. या सर्वांना कायमस्वरूपी सेवेमध्ये सामावून घ्यावं आणि नंतर उर्वरीत भरती शासनाने रीतसर प्रक्रिया राबवून करावी.असे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदार संघाचे मा.आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी येथे पुकारलेल्या आंदोलनास पाठिंबा दिर्शविताना केले.
डॉ.तांबे बोलताना पुढे म्हणाले की या लोकांना वर्षानुवर्षे अत्यंत अल्प वेतन देऊन त्यांचे मोठे शोषण झाले आहे.या सर्वांना न्याय देण्यात यावा अशा प्रकारची मागणी आयुक्तांना भेटून केली यावेळी माझ्या समावेत श्री शिवसेनेचे कामगार नेते श्री.दिंडे हे देखील उपस्थित होते.
आंदोलनकर्त्या सर्व बांधवांची भेट घेत त्यांनी प्रश्न समजावून घेतले. आमदार सत्यजीत तांबे यांनी हा प्रश्न विधान परिषदे मध्ये उपस्थित करत त्याला वाचा फोडलेली आहे. या सर्वांना लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी सर्व त्या प्रकारचा पाठपुरावा आमदार सत्यजीत तांबे शासन दरबारी करत आहेत असे डॉ सुधीर तांबे यांनी स्पष्ट केले