नाशिक प्रतिनिधी येथे नुकत्याच पार पडलेल्या जयहिंद लोकचळवळ आयोजित शेतकरी मेळावा आणि शेतकरी सन्मान सोहळ्यात शाश्वत आणि रासायनिक अवशेषमुक्त शेतीच्या दृष्टीने डॉ. प्रशांत नाईकवाडी लिखित 'झिरो रेसिड्यू' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.हे पुस्तक शेतकऱ्यांना रासायनिक खते व औषधांचा वापर टाळून सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याच्या तंत्रज्ञानावर आधारित आहे.
या प्रकाशन सोहळ्याला महाराष्ट्राचे राज्यमंत्री इंद्रनिल नाईक, मा. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, खासदार शोभा बच्चाव, मा. विधान परिषद सदस्य डॉ सुधीर तांबे आमदार सत्यजीत तांबे आणि आमदार मनोज कायंदे यांच्यासह जयहिंद लोकचळवळचे संपुर्ण महाराष्ट्रातील समन्वयक उपस्थित होते.