श्रीरामपूर दिपक कदम श्रीरामपूर लगत असणाऱ्या अशोकनगर या गावातील आषाढी एकादशी निमित्त निघालेल्या शालेय दिंडी चे भव्य स्वागत अशोकनगर मधील नित्य सहाय्यक माता चर्चच्या वतीने करण्यात आले.
या दिंडीचे आगमन अशोकनगर मधील संपूर्ण गावांमधून काढून गावकऱ्यांना विठ्ठल रुक्माई चे साक्षात दर्शन झाल्यासारखे वाटले.या शालेय दिंडीचे आयोजन अशोकनगर परिसरातील रामराव आदिक पब्लिक स्कूलच्या सर्व शिक्षकवृंदांनी केले होते.ही दिंडी अशोकनगर मधील वॉर्ड नंबर 3 मधून बाजारपेठेमधून अशोकनगर मधील दत्त मंदिर या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी सर्व देवतांची पूजा करून दर्शन घेऊन दिंडी अशोकनगर मधील नित्य सहाय्यक माता चर्च च्या प्रारंगणात आली.
या ठिकाणी फादर ऑल्विन के.यांच्या हस्ते पालखीचे भव्य स्वागत करण्यात आले.चर्च मधील महिलांनी पालखीचे पूजन केले.यावेळी नित्य सहाय्यक माता चर्च च्या प्रारंगणात शालेय विद्यार्थिनींनी विठ्ठल.. विठ्ठल.. विठ्ठला..हरी ओम विठ्ठला..या गाण्यावर अप्रतिम मनमोहक पद्धतीने लेझीम नृत्य केले.
या लेझीम नृत्यामुळे चर्चमधील परिसर व आसपास जमलेल्या भाविकासह सर्व वातावरण भक्तिमय झाले.फादर अल्विन यांनी बोलताना सांगितले की सर्व मानव जातीचे रक्त एकाच रंगाचे आहे त्यामुळे आपण सर्व एक आहोत,सर्व मनुष्य जात एकच आहे.
त्यामुळे समाजात राहताना सर्वजण एकोप्याने राहावे.एकोप्याची भावना सर्वांच्या मनामध्ये रुजावी.शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनींनी चांगल्या प्रकारचे शिक्षण घेऊन आपल्या स्वतःच्या पायावर उभे रहावे आणि कुठल्याही विद्यार्थिनींना शिक्षणासाठी काही अडचण आल्यास त्यांच्या पालकांनी माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहन ही त्यांनी केले.
मुलींच्या शिक्षणासाठी मी सदैव तयार आहे.असे यावेळी त्यांनी सांगितले.दिंडी मध्ये आलेल्या शिक्षकांचे फादर ऑलविन के.यांनी शिक्षक श्री.शेळके ,श्री.वाघ, श्री.जाधव श्री. वैराळ पटेल,येवले ,भडकवार ,अंगारखे ,कहांडळ ,खंडागळे यांचा राम.. कृष्ण...हरी..हे शब्द
लिहिलेल्यांचा शाल देऊन सत्कार केला तर शीला येवले,शालिनी भालेराव,नलिनी भालेराव,सारिका भालेराव,स्वाती भालेराव,अनिता पाळंदे यांनी आढाव ,राठोड ,साळुंके ,पवार,राऊत ,सातदिवे ,ताम्हाने ,लांडे ,आहिरे ,ताके ,गोरे ,माळी , बर्डे ,निधाने ,चौधरी ,जाधव
,यु.सी.गोरे ,निबाळकर ,परदेशी,गवळी पेरणे ,घाडगे ,रणछोड , वी.आर.जाधव ,दौंड यांचा शाल देवून सत्कार केला.शाळेतील विद्यार्थिनींना फादर ऑल्विन यांनी ५००० रुपये रोख रकमेचे बक्षीस दिले व सर्व विद्यार्थ्यांना बिस्किट व चॉकलेटचे वाटप करण्यात आले.
यावेळी रिजनल ख्रिश्चन सोसायटीचे संदीप तोरणे,रवींद्र अंकुश,अशोक बारसे, रमेश वाघमारे,अशोक शिरसागर, अशोक भोसले,यश येवले,स्तवन तोरणे,रितेश पाळंदे,आयुष तोरणे यांनी देखील दिंडीतील विद्यार्थ्यांसाठी चहा पाण्याची व्यवस्था केली होती.या दिंडी मध्ये सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनीं व परिसरातील नागरिकांनी आवर्जून यांनी सहभाग घेतला होता.
