एक हजारांहून अधिक विद्यार्थिनींनी घेतले स्वसंरक्षणाचे धडे
मावळ सिटीलाईन न्युज नेटवर्क लोणावळा,लायन्स क्लब ऑफ लोणावळा सुप्रिमोज,जिल्हा अधिकारी, शुभचिंतक आणि मित्रपरिवार तसेच क्लब अध्यक्ष एमजेएफ लायन सुरैया वाडीवाला यांच्या नेतृत्वाखाली लायन्स क्लब ऑफ लोणावळा सुप्रीमोजनेच्या वतीने लोणावळ्यातील विविध शाळेतील मुलींसाठी ३ उपक्रम आयोजित केले. ह्यात १००० हुन अधिक विद्यार्थिनींसाठी स्वसंरक्षणाचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.गुड अँड बॅड टच बद्दल शाळेतील विद्यार्थिनींना माहिती देण्यात आली. व्हीपीएस हायस्कूलच्या ४०० विद्यार्थिनी, डी.पी. मेहता ज्युनियर कॉलेजच्या ४०० विद्यार्थिनी आणि डॉ. बी. एन. पुरंदरे हायस्कूलच्या २०० विद्यार्थिनी यांना मिस महाराष्ट्र २०१८ आणि ब्लॅक बेल्ट चॅम्पियन
मिस रूपाली पवार यांनी लायन्स क्लब ऑफ लोणावळा सुप्रीमोजने आयोजित केलेल्या या स्वसंरक्षण शिबिरात मार्गदर्शन केले.या उपक्रमांना प्रमुख पाहुणे माजी जिल्हा गव्हर्नर एमजेएफ लायन अभय शास्त्री उपस्थित होते. क्लबचे अध्यक्ष लायन हायस्कूलच्या ४०० विद्याथिना,
डा.पा. मेहता ज्युनियर कॉलेजच्या ४०० विद्यार्थिनी आणि डॉ. बी. एन. पुरंदरे हायस्कूलच्या २०० विद्यार्थिनी यांना मिस महाराष्ट्र २०१८ आणि ब्लॅक बेल्ट चॅम्पियन मिस रूपाली पवार यांनी लायन्स क्लब ऑफ लोणावळा सुप्रीमोजने आयोजित केलेल्या या स्वसंरक्षण शिबिरात मार्गदर्शन केले.
या उपक्रमांना प्रमुख पाहुणे मा.जिल्हा गव्हर्नर एमजेएफ लायन अभय शास्त्री उपस्थित होते.क्लबचे अध्यक्ष लायन सुरैया वाडीवाला यांच्या नेतृत्वाखाली हे उपक्रम आयोजित करण्यात आले होते, आणि जिल्हा अध्यक्ष इमेज बिल्डिंग लायन अमीन वाडीवाला यांच्या समन्वयाने हे उपक्रम आयोजित करण्यात आले.
या उपक्रमांना लायन सुधीर कदम, लायन गिरीश पारख, लायन छाया वर्तक,लायन यशश्री तावरे, आणि कॅनडातील आघाडीच्या सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती शाहीन विरजी उपस्थित होत्या. व्हीपीएसचे प्राचार्य विशाल, व्हीपीएस हायस्कूल आणि डी पी मेहता ज्युनियर कॉलेजच्या वतीने कुंडलिक सर यांनी या उपक्रमाचे समन्वयन केले.
डॉ.बी एन पुरंदरे हायस्कूलच्या वतीने मुख्याध्यापक आनंद गावडे यांनी या उपक्रमाचे समन्वयन केले.
रुपाली पवार यांनी तिन्ही शाळांना स्वसंरक्षण शिबिर पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र प्रदान केले. एकूण १००० विद्यार्थिनींसाठी यशस्वी स्वसंरक्षण शिबिर यशस्वीरित्या पार पडले.