नाशिक दिनकर गायकवाड दिंडोरी तालुक्यातील
सहाय्यक निबंधक कार्यालय दिंडोरी महारुद्र ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित सोनजांब व जय योगेश्वर पतसंस्था अक्राळे यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष व सहकार मंत्रालय स्थापना दिन सप्तशृंगी अनाथ व वृद्धाश्रम नांदुरी येथे साजरा करण्यात आला.
यावेळी सहाय्यक निबंधक वैभव मोरडे, महारुद्र पतसंस्थेचे अध्यक्ष बाबुराव जाधव, उपाध्यक्ष सुनील संधान, संचालक वसंतराव जाधव, सचिन जाधव,कचरू शेळके, सोनजांबचे सरपंच प्रभाकर जाधव, व्यवस्थापक देविदास जाधव, जय योगेश्वर पतसंस्थेचे अध्यक्ष जी. एम. गायकवाड, उपाध्यक्ष राजेंद्र गाडगीळ यांनी आश्रमातील वृद्धांशी व बालकांशी हितगुज केले.
दोन्ही पतसंस्थांनी अन्नदानच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंचे किराणा मालाचे व कडधान्याचे वाटप केले. यावेळी आश्रमाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी दोन्ही संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.