नाशिक दिनकर गायकवाड दिंडोरी येथील ज्युनिअर कॉलेज ऑफ एज्युकेशन अध्यापक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.
अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. संजय काळोगे होते. गुरुपौर्णिमेनिमित्त सर्व विद्यार्थ्यांकडून शिक्षकांचा पेन व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. अर्चना महाले यांनी गुरु पौर्णिमेचे महत्त्व सांगून विद्यार्थाना मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. संजय काळोगे यांनी विद्यार्थ्यांच्या विकासात पालकांचा जेवढा वाटा असतो तितकाच वाटा शिक्षकांचा देखील असतो.
ज्यांच्याकडून आपण विद्या प्राप्त करतो त्याच विद्येच्या बळावर आपला विकास होत असतो. सूत्रसंचालन शितल बोरसे यांनी केले आभार मृणाल फंड हिने मानले. याप्रसंगी विद्यार्थी, शिक्षकवृंद उपस्थित होते.