ओजस्वी भारत फाउंडेशन संचलित नंदी आश्रम शाळेस पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांची भेट
संगमनेर नितीनचंद्र भालेराव सर्वत्र गुरुपौर्णिमेचे वातावरण पाहण्यास मिळाले.अनेक मंदिरामध्ये गुरुपौर्णिमा निमित्त भजन,कीर्तन आणि प्रवचनासह विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. परंतु ओजस्वी भारत फाउंडेशनचे संस्थापक राजर्षी महंत एकनाथ महाराज यांच्या संकल्पनेतून तसेच आमदार अमोल खताळ यांच्या सहकार्यातून संगमनेर तालुक्यातील सर्व पोलीस कर्मचारी ग्रामीण भागातील अंगणवाडीतील विद्यार्थी यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. तसेच हिवरगाव पावसा येथील महाराष्ट्रातील पहिली नंदी आश्रम शाळेस पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांनी भेट दिली.
याप्रसंगी उपस्थित शालेय विद्यार्थ्यांना ओजस्वी भारत फाउंडेशन च्या वतीने हा प्रसादाचे वाटप करण्यात आले. छाया-बच्चन भालेराव
गुरुपौर्णिमे निमित्त हिवरगाव पावसा येथील अंगणवाडीतील छोट्या विद्यार्थ्यांना पावसाळा निमित्त ओजस्वी भारत फाउंडेशनच्या वतीने छत्रीचे वाटप करण्यात आले. छत्री वाटप उपक्रमामुळे लहानगे विद्यार्थी भारावून गेले होते त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.
तसेच संगमनेर तालुक्यातील सर्व पोलीस कर्मचारी,टोल नाक्यावरील सर्व कर्मचारी वर्गास छत्र्यांचे वाटप करण्यात आले. तसेच फाउंडेशन मार्फत अयोध्या येथील साधू संत यांना छत्री वाटप करण्यात आले.
ओजस्वी भारत फाउंडेशन समाज उपयोगी उपक्रम राबवत आहे.त्यांच्या कार्याची दखल घेत संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल खताळ यांचे उपक्रमासाठी विशेष सहकार्य लाभले.गुरुपौर्णिमेनिमित्त छत्री वाटप,महाप्रसादाचे वाटप या ओजस्वी भारत फाउंडेशनच्या अभिनव उपक्रमाचे तालुक्यात सर्वत्र चर्चा व कौतुक होत आहे. याप्रसंगी ओजस्वी भारत फाउंडेशन संस्थापक राजर्षी महंत एकनाथ महाराज,
अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष उत्तम नाना जाधव,जिल्हा उपाध्यक्ष विकास हासे,संगमनेर तालुकाध्यक्ष महेश पावसे,संगमनेर भाजपाचे मा. तालुकाध्यक्ष काशिनाथ पावसे, भाजप तालुका उपाध्यक्ष गणेश दवंगे,शिवसेना मागासवर्गीय सेल जिल्हाध्यक्ष सोमनाथ भालेराव यांच्या सह इतर मान्यवर तसेच हिवरगाव पावसा ग्रामस्थ उपस्थित होते. छाया-बच्चन भालेराव