कोल्हार प्रतिनिधी राहाता तालुक्यातील कोल्हार येथील 'लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधिने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या 'कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात' सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ गुणवत्ता सुधार योजने अंतर्गत बुधवार दिनांक १६ जुलै, २०२५ रोजी 'महिला सबलीकरण व सक्षमीकरण कार्यशाळा' उत्साहात पार पडली.
या कार्यशाळेचे उद्घाटन राहाता न्यायालयाचे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी नेहा जोशी यांच्या हस्ते झाले.
यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रवरा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ.भास्कर खर्डे पा. होते.ही कार्यशाळा दोन सत्रात घेण्यात आली.
पहिल्या सत्रात नेहा जोशी, ॲड.एस.एम. झाडे व ॲड.शोभा म्हस्के यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.त्यांनी आपल्या भाषणात 'महिलां विषयीच्या वेगवेगळ्या कायद्यांची माहिती सांगून महिलांना सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रांमध्ये
समान संधी मिळवून देणे, तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे, यासाठी कोणते कायदे करण्यात आलेले असून महिलांनी कोणत्या प्रसंगी कोणत्या कायद्यांचा आधार घ्यावा' याविषयी मार्गदर्शन केले.डॉ.भास्कर खड़े पा.यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात 'महिला
सबलीकरणाचे स्वरुप सांगून सियांच्या विकासासाठी त्यांना सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रांमध्ये समान संधी मिळवून देणे, तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे कसे महत्वाचे आहे' याविषयी मार्गदर्शन केले. या सत्राचे स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरीभाऊ आहेर यांनी केले, त्यांनी आपल्या प्रास्ताविकात 'महिला
सबलीकरण व सक्षमीकरण कार्यशाळा घेण्या मागील भूमिका' स्पष्ट केली. आभार उपप्राचार्या डॉ.प्रतिभा कानवडे यांनी मानले. दुसऱ्या सत्रात सेवानिवृत्त जिल्हा पोलिस अधीक्षक.सौ. लता वाघमारे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले,त्यांनी आपल्या भाषणात 'कायद्यांमुळे महिला कशा आत्मनिर्भर बनलेल्या आहेत' याविषयी माहिती दिली.
या सत्रात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरीभाऊ आहेर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. या सत्राचे स्वागत व प्रास्ताविक प्रा, मनिषा वडितके यांनी केले तर डॉ.अर्चना विखे यांनी आभार मानले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा. सौ. संगीता धिमते यांनी केले. या कार्यक्रमासाठी संभाजीराजे पाटील देवकर, उपसरपंच प्रकाश खर्डे पा. तेजश्री वाघमारे, पत्रकार संजय कोळसे, प्रमोद कुंभकर्ण तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.