नाशिक दिनकर गायकवाड चांदवड तालुक्यातील राहुड परिसरात बिबट्याच्या दहशतीमुळे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अखेर बिबट्या जेरबंद झाला; मात्र आणखी एखादा बिबट्या असण्याची शक्यता राहुड ग्रामस्थांनी व्यक्त केली असून, बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातून होत आहे.गेल्या काही आठवतयांपासून या भागात बिबट्याचे सातत्याने दर्शन होत होते, अनेक पाळीव प्राण्यांवर व नागरिकांवरही बिबट्याने हल्ले केले आहेत.
गौतम पुंडलिक कापडणे यांचा पोल्ट्री फार्म, कळमदरे रोड व माजी सभापती गणपतराव पवार यांच्या वस्तीजवळ १५ दिवसांपूर्वी या फार्ममध्ये घुसून बिबट्याने तब्बल १७ ते १८ कोवळयांचा फडशा पाडला होता. त्यामुळे याठिकाणी वन विभागाच्या वतीने पिंजरा लावण्यात आला होता.