आमदार गोपीचंद पडळकरांच्या बेताल आणि अक्षेपार्ह वक्तव्याचा निषेधार्थ येवल्यात ख्रिस्ती बांधवांचा निषेध मोर्चा

Cityline Media
0
येवला प्नतिनिधी आमदार गोपीचंद पडळकरांच्या बेताल आणि अक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करत शहरातील विंचूर चौफुलीवरील भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून घोषणा देत चर्चचे  रेव्हं पिटर काळे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चास सुरवात झाली व येवला तहसील कार्यालय समोर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले यावेळेस नाशिक धर्मप्राताचे उपाध्यक्ष रूपेश निकाळजे  खजिनदार संजय वाघमारे रेव्हं प्रविण घुले साहेब स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे नाशिक जिल्हाध्यक्ष महेंद्र पगारे यांची निषेधार्थ भाषणे झाली.
यावेळेस नायब तहसीलदार पंकज नेवसे यांनी निवेदन स्विकारले ख्रिस्ती समाज हा अतिशय शांत प्रिय समाज असून प्रार्थना करून देवाकडे सुख शांती करूणा मैत्री उत्तम आरोग्य मागतो आतापर्यंत ह्या महाराष्ट्रात आमच्या समाज्याकडून जातीयवाद समाजवाद कधीच निर्माण झालेला नाही

परंतु आमदार गोपीचंद पडळकर यांनी जाहीर रित्या आमच्या ख्रिस्ती समाज्याबद्दल अतिशय बेजबाबदारपणे वक्तव्य करून ख्रिस्ती धर्मगुरूना मारहाण केली तर तीन लाख हात पाय तोडले तर पाच लाख व सैराट करणाऱ्यास (जीवे मारणाऱ्या)११ लाखाचे बक्षिस जाहीर केले आहे त्यांच्या ह्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील व संपुर्ण देशातील ख्रिस्ती धर्मगुरूच्या जीवितास धोका निर्माण झालेला आहे म्हणून आज रोजी आम्ही लोकशाही मार्गाने मोर्चा काढून मागणी करत आहोत कि त्यांनी आपल्या आमदार पदाचा गैरवापर केला असून तात्काळ राजीनामा देऊन त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

जर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली नाही तर यापुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी  असा इशारा देण्यात आला
यावेळेस मोर्चातील जनसमुदाया समोर व्यक्त होत शासनाला बजावले.

या विशाल मोर्चा रेव्ह. पिटर काळे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र पगारे
नाशिक धर्मप्रान्तचे उपाध्यक्ष रेव्ह. रूपेश निकालजे 
नाशिक धर्मप्रान्तचे ख़जिनदार संजय वाघमारे रेव्ह. प्रवीण घुले रेव्ह.प्रशांत बनसोडे स्वयंसेवक आनंद 

आस्वले स्वयंसेवक चंद्रभान मोरे पा.साहेबराव झाल्टे जॉनी जॉर्ज विशाल लोंडे राजू जावळे बच्चू जावळे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष विजय घोड़ेराव सुरेश खळे वंसत घोडेराव विनोद त्रिभुवन गणेश झाल्टे समाधान गुंजाळ साहेबराव झाल्टे अजय धिवर समाधान धिवर दिपक गुंजाळ सतिष धिवर एस.आर.काळे सौ.संगीता गवित फ्लोरेंस नायडू सुनीता अहिरे उज्वला पथारे वैशाली मावस रोहिणी भोसले ख्रिस्त सेवक सौ‌.झाल्टे विशाल जाधव याच्यांसह शेकडो लोक सहभागी झाले होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!