प्रवरा नदीवरील ब्रिटिश कालीन पुलासह राज्यातील सर्व जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करा

Cityline Media
0
आमदार अमोल खताळ यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडत केली मागणी
 
संगमनेर संजय गायकवाड पुलांची सुरक्षितता आणि ते वापरण्यासाठी योग्य आहे की नाही हे तपासले जाऊन प्रवरा नदीवरील ब्रिटिश कालीन पुलासह राज्यातील सर्व जुन्या पुलांची तपासणी करून ॲडीट करण्याची मागणी करताना विधानसभेचे लक्ष वेधत आमदार अमोल खताळ म्हणाले की पुणे- नाशिक महामार्गावरील संगमनेर खुर्द आणि संगमनेर बुद्रुकला जोडणारा ब्रिटिशकालीन पूल आजही वापरात आहे. या पुलासह राज्यातील सर्व जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे आणि संभाव्य दुर्घटना टाळाव्यात यावेळी संगमनेरातील रखडलेल्या कामाबाबतही त्यांनी शासनाचे लक्ष वेधले.
मुंबई येथे सुरू असलेल्या विधिमंडळ पावसाळी अधिवेशनात आमदार खताळ यांनी हा प्रश्न उपस्थित करत शासनाचे लक्ष वेधले .जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून किती दिवसांमध्ये पुनर्बांधणीसाठी होणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला .संगमनेरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणारी रस्त्याची कामे  ठरलेल्या वेळेत पूर्ण होत नाहीत. शासननिधी खर्च करायला तयार आहे पण त्यावर  काहीही परिणाम होत नाही त्या मुळे ती  कामे वेळेत पूर्ण होत नाहीत,ही बाब लक्षात घेता वेळेमध्ये काम पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी लक्षवेधी सूचना आमदार  खताळ यांनी मांडली.

आमदार खताळांच्या सुचनेनंतर बांधकाम मंत्र्यांचे आश्वासन
-पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत तीन ते चार पर्यटकांचा बळी गेला तर काही जण जखमी झाले. या प्रकरणी दोषी असणाऱ्यांवर अद्याप कारवाई झाली नाही तसेच या प्रकरणाची चौकशी झाली नाही ,या कडे आ.खताळ यांनी विधिमंडळाचे लक्ष वेधले.त्यावर उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम  मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी या दुर्घटनेबाबत एक समिती स्थापन केलेली आहे त्या समितीचा अहवाल प्राप्त होणे बाकी आहे अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्या प्रकरणात जे कोणी दोषी आहे त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे विधानभवनात सांगितले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!