नाशिक दिनकर गायकवाड- नाशिकच्या राजकारणामध्ये पुन्हा काही नेते पक्ष बदल करण्याच्या तयारीत आहेत. नाशिकचे माजी खासदार भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
या राजकीय खेळीने शिंदे गटाला धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उबाठा शिवसेनेचे नेते सुधाकर बडगुजर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर याच पक्षाचे महानगरप्रमुख पदावर असलेले विलास शिंदे यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला.त्यानंतर माजी महापौर अशोक मुर्तडक व अन्य काही जणांनी भाजपामध्ये प्रवेश केला. उबाठाचे ज्येष्ठ नेते सुनील बागुल व महानगर प्रमुख मामा राजवाडे हे देखील भाजपच्या वाटेवर आहेत.