नाशिक जिल्ह्यातील साल्हेर मुल्हेर किल्ल्याचा समावेश
नाशिक दिनकर गायकवाड महाराष्ट्रातील ११ गड आणि तामिळनाडूतील जिंजी गड यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये झाल्याची गौरवशाली घोषणा नुकतीच झाली. या ऐतिहासिक क्षणानिमित्त,शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, नाशिक शहर जिल्हा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
युनेस्को तर्फे आजपर्यंत महाराष्ट्रातील लेण्या,मंदिरे यांची नोंद करण्यात आली पण छत्रपती शिवाजी महाराजांचे हे गड केवळ महाराष्ट्राची नव्हे तर संपूर्ण भारताची अभिमानाची शिखरे आहेत.
हे सर्व गड म्हणजे आपल्या राष्ट्राच्या स्वातंत्र्य आणि स्वाभिमानाचे प्रतीक असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास जपणारे हे ऐतिहासिक दुर्ग आज जागतिक
स्तरावर गौरवले गेले आहेत. यामुळे छत्रपती शिवाजी
महाराजांचे दूरदृष्टी, वास्तुकला स्थापत्यशास्त्र याची कल्पना संपूर्ण जगाला येईल तसेच नाशिक जिल्ह्यातील साल्हेर किल्ल्याचा समावेश यामध्ये करण्यात आला असून सर्व नाशिककरांसाठी हा अभिमानाची बाबा आहे असे शिवसेना उपनेते तथा जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी याप्रसंगी सांगितले.
याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख शिवाजी भोर, सहसंपर्क प्रमुख गणेश कदम, जिल्हा संघटक योगेश म्हस्के,मध्य विधानसभा प्रमुख रोशन शिंदे, उपजिल्हाप्रमुख प्रमोद लासुरे, गडकिल्ले संवर्धन कक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आकारा कोकाटे, जिल्हाप्रमुख आकाश आहेर, युवासेना जिल्हा समन्वयक दर्शन ठाकूर, यश बच्छाव, बजरंग दल जिल्हा संयोजक श्रीकांत क्षत्रिय आदी उपस्थित होते.