मुंबई सिटीलाईन न्यूज नेटवर्क गोंदिया जिल्हा रुग्णालयातील आरोग्यसेवा बळकट करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.या रुग्णालयात ज्या सुविधा सध्या उपलब्ध नाहीत, त्या आरोग्यसुविधा तात्काळ उपलब्ध होणे व इतर अडचणींबाबत बैठक घेण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
तसेच राज्यातील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांचे मानधन केंद्रशासन आणि राज्य शासनाकडून देण्यात येते. केंद्रशासनाचा निधी आला नसल्याने मधल्या काळात मानधन प्रलंबित राहिले होते.आता निधी प्राप्त झाला असून मानधन वितरणाची प्रक्रिया सुरू आहे,असे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत सांगितले.