पोलिस पंचनाम्यात माहीती उघड, मुद्देमाल जप्त करण्याची मागणी
पारनेर प्रतिनिधी पारनेर साखर कारखाना विक्री गैरव्यवहारातील मुद्देमाल आरोपींनी कारखाना साईटवरुन गायब केल्याची घटना उघड झाली आहे.हा मुद्देमाल अंदाजे सुमारे १५० कोटी रुपये किमतीचा आहे.पारनेर सहकारी साखर कारखाना विक्री गैरव्यवहार प्रकरणातील गुन्ह्याच्या मुद्देमालाची चौकशी करण्याकामी कारखाना साईटची तपासी अधिकारी व फिर्यादी असलेल्या कारखाना बचाव समितीने पाहणी केली असता हे दिसुन आले आहे.
कारखाना बचाव समितीने या गुन्ह्यातील मुख्य मुद्देमाल असणाऱ्या कारखाना मशिनरीचा पंचनामा करण्याची मागणी पोलिसांकडे केली होती. त्यानुसार तपासी अधिकारी यांनी कारखाना साईटची पाहणी करून पंचनामा केला. यावेळी या ठिकाणची मशिनरी आरोपींनी इतरत्र हलविली असल्याचे दिसुन आले.
यातील आरोपींवर पारनेर न्यायालयाच्या आदेशानंतर जानेवारी महिन्यात गुन्हा दाखल झाला होता. आरोपींच्या पुर्नविचार याचिकेवर अ.नगर सत्र न्यायालयाने काही काळासाठी स्थगिती दिली होती.
२ जुलै रोजी सत्र न्यायालयाने स्थगिती उठवत आरोपींची
पुर्नविचार याचिका फेटाळून लावत तपासाला सामोरे जाण्याचे आदेश दिले.
त्यानंतर तपासाला गती मिळाली असुन तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांनी गुन्ह्यातील साक्षीदारांचे जबाब नोंदविण्याचे काम चालु केले आहे.त्या अनुषगाने तपासाचे काम चालु असुन मुळ मुद्देमाल मशिनरी कारखाना साईट वरून आरोपींनी गायब केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
दोन सरकारी पंच समक्ष तसा पंचनामा पोलिसांनी केला आहे.कारखाना साईटवरील पेट्रोल पंप देखील गायब केला असुन त्याचा स्वतंत्र पंचनामा करण्यात आला आहे.या गुन्ह्यांच्या गैरव्यवहाराची व्याप्ती सुमारे ४०० कोटींची असुन राज्य सहकारी बॅकेचे अनंत भुईभार,
अनिल चव्हाण हे दोन वरीष्ठ अधिकारी,क्रांती शुगर कंपनीचे अध्यक्ष ज्ञानेश नवले, पांडूरंग नवले, दत्तात्रय नवले, भिकु नवले, जालिंदर नवले, गुलाब नवले, शिवराज नवले, श्रीधर नवले, निवृत्ती नवले हे प्रमुख आरोपी आहेत.हा मुद्देमाल जप्त करण्याची मागणी कारखाना बचाव समितीने पोलिसांकडे केली आहे.यावेळी