मुंबई सिटीलाईन न्यूज नेटवर्क राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा.खा सुनील तटकरे यांच्या मान्यतेने नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस आदिवासी सेलच्या राज्यप्रमुखपदी आमदार हिरामण खोसकर यांची नियुक्ती करण्यात आली.
पक्षाच्या वाढीसाठी व पक्षाचे ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण कायम सक्षम आणि तत्पर असाल याची पक्षाला खात्री आहे.असा विश्वास प्रदेशाध्यक्षांनी यावेळी व्यक्त केला.
या वेळी माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते मा.आ.धर्मरावबाबा आत्राम,राज्य महिला आयोग अध्यक्षा तथा महिला प्रदेशाध्यक्षा मा.सौ. रूपाली चाकणकर,प्रदेश सरचिटणीस तथा कोषाध्यक्ष आ.शिवाजीराव गर्जे, मा. आ. नितीन पवार, मुख्य प्रवक्ते मा.आनंद परांजपे, प्रवक्ते संजय तटकरे, सहकोषाध्यक्ष संजय बोरगे आमदार किरण लहामटे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.