श्रीरामपूर दिपक कदम येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा परवानगी संदर्भात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी दूरध्वनी करून वृतांत सांगितला.
श्रीरामपूर शहरामध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा गेली पन्नास वर्षापासून आहे त्याच ठिकाणी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा स्थापित करायचा आहे त्या संदर्भात नगरपालिकेने ठराव करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा तयार करून त्याचे १५ लाख रुपये देखील अदा केले आहे.
सर्व शासकीय कार्यालयाचे ना हरकत दाखले भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समारक समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जमा केले आहे परंतु ती जागा वनविभागाची असल्याने परवानगीला अडचण येत होती परंतु त्या संदर्भात त्रिभुवन यांनी डॉ
बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची जागा निर्वाणीकरण झाली असल्याची नोंद हस्तगत केली आहे तरी देखील तत्कालीन जिल्हाधिकारी हे परवानगी देण्यास टाळाटाळ करत होते परंतु आत्ता नव्याने रुजू जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया हे श्रीरामपूर येथे आले असता त्यांना
शिष्टमंडळ भेटून सर्व परवानग्या दाखवल्या आहे तसेच पूर्णाकृती पुतळा परवानगी संदर्भात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना सुभाष त्रिभुवन यांनी फोन करून जिल्हाधिकारी यांना फोन करण्यास सांगितले असता आठवलेंनी जिल्हाधिकाऱ्यां फोन करून भारतरत्न डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा परवानगी लवकर देण्याच्या सूचना केल्या आहे तसेच पुतळा परवानगी संदर्भात रामदास आठवले यांचे स्विय सहाय्यक यांना पाठपुरावा करण्यास सांगितले आहे म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती
पुतळा बसवण्याच्या हालचाली वेगाने चालू झाल्या असून लवकरच श्रीरामपुरात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्यदिव्य पूर्णाकृती पुतळा बसवण्यास परवानगी लवकरच मिळून आंबेडकरी अनुयायांचे स्वप्न साकार होणार आहे असा ठाम विश्वास भारतरत्न डॉ
बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन भीमराज बागुल सुनील शिरसाठ विजय पवार रॉकी लोंढे चरण त्रिभुवन सचिन ब्राह्मणे रमादेवी धीवर राजू नाना गायकवाड सुरेश जगताप विशाल सुरडकर मनोज काळे मोहन आव्हाड सोनू राठोड संजय बोरगे निलेश भालेराव संदीप पवार किशोर ठोकळ संजय सूर्यवंशी सुनील पडवळ निलेश भालेराव मिलिंद धीवर गोरख आढाव यांनी व्यक्त केला आहे
