मुंबई सिटीलाईन न्यूज नेटवर्क मुंबईतील आझाद मैदान येथे खाजगी प्राथमिक,माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक समन्वय संघाच्यावतीने सुरु असलेल्या आंदोलनाला नुकतीच खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दिर्शविला.१४ ऑक्टोबर २०२४ च्या शासन निर्णयाचे पूर्णतः अनुपालन करावे,अशी शिक्षकांची मागणी आहे.यावेळी खासदार सुळे यांनी शिक्षकांशी संवाद साधला. शासनाकडे शक्तिपीठ महामार्गासाठी कोट्यावधी रुपये आहेत.पण शिक्षकांना देण्यासाठी नाहीत, ही दडपशाही आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य स्थापन केले होते.पण आज दलालांचे राज्य असल्याचा आरोप केला. आज संध्याकाळ पर्यंत सरकारने आंदोलकांशी सकारात्मक चर्चा न केल्यास उद्यापासून आपण देखील आंदोलनात सामील होऊ,असे सांगितले.आपण स्वतः याबाबत शासनाकडे पाठपुरावा करत असून,गरज पडली तर आपण विधानभवनावर मोर्चा काढू,असे सांगत राज्य शासनाने शिक्षकांना न्याय द्यावा,अशी मागणी केली.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पदवीधर सेलचे राज्य प्रमुख डॉ.नरेंद्र काळे, शिक्षक संघटना मराठवाडा विभागीय प्रमुख प्रा.किरण सोनटक्के, महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समिती चे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे, यांच्यासह मोठ्या प्रमाणात शिक्षक उपस्थित होते.