पंढरपूर सिटीलाईन न्यूज नेटवर्क पाच वर्षांपूर्वी एक संकल्प केला होता की चाळीसगाव तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांना विठुरायाच्या दर्शनासाठी, सन्मानाने आणि सोयीने पंढरपूर वारीला घेऊन जायचं.त्या संकल्पाला आजही तितक्याच निष्ठेने, श्रद्धेने आणि प्रेमाने वाहिलेलो आहे असे गौरवोद्गार चाळीसगाव विधानसभेचे आमदार मंगेश रमेश चव्हाण यांनी काढले.
यावर्षी चाळीसगाव ते पंढरपूर या विशेष रेल्वेच्या माध्यमातून ४ हजाराहून अधिक भाविक पांडुरंगाच्या दर्शनासाठी घेऊ जात आहे,पवित्र वारीच्या प्रस्थान सोहळ्यास राज्याचे जलसंपदा मंत्री मा. गिरीश महाजन यांच्या हस्ते पालखीला खांदा मिळाला, विशेष रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून त्यांनी वारीला शुभेच्छा दिल्या.त्यांचं मार्गदर्शन, प्रेम आणि उपस्थिती ही माझ्यासाठी ऊर्जा आहे असे आमदार चव्हाण म्हणाले.
प्रसंगी पुढे आमदार चव्हाण म्हणलं की आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात पंढरपूर वारी प्रस्थान सोहळ्याप्रसंगी माऊलींची पालखी पूजन करताना मनात अगदी हळवे क्षण उभे राहिले. आई-वडिलांच्या पायाशी बसून विठ्ठलाचे अभंग ऐकत मोठा झालो, ते अभंग आज टाळ-मृदुंगाच्या गजरात हजारो भाविकांच्या ओठांवर होते. मन भरून आलं डोळ्यांत पाणी आलं पण हृदयात मात्र समाधान होतं.
या सोहळ्याला उपस्थित जळगाव लोकसभा खासदार सौ. स्मिता वाघ, जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार, भारतीय जनता पक्षाचे सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते, आणि सर्वच भाविक वारकरी यांचे मन:पूर्वक आभार.
ही वारी म्हणजे केवळ धार्मिक यात्रा नाही तर ती आपल्या संस्कृतीची सजीव प्रचिती आहे.
ही भक्तीची आणि सेवेची वारी आहे. ही हजारो वारकरी मायबापांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणारी वारी आहे.