रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सुभाष त्रिभुवन यांच्याकडून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना केला पुरावा सादर
श्रीरामपूर दिपक कदम पणन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे श्रीरामपूर दौऱ्यावर असताना येथे आले असता श्रीरामपूर नगरपरिषद यशवंतराव सभागृह याठिकाणी नागरिकांच्या समस्या संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची जागा दोन गुंठे आठ आणे जागा निर्वाणीकरण झाले असल्याबाबत सुभाष त्रिभुवन यांनी आपल्या भाषणात सविस्तर सांगितले.
वन जमीनबाबतचे अभिलेख नमुना नंबर एक मध्ये शासन अधिसूचना क्रमांक हा ५३६/२/१०१९६ दिनांक अन्वये मौजे गोंधवणी तालुका कोपरगाव येथील मूळ सर्वे नंबर ३२८ चे दोन गुंठे आट आणे इतके क्षेत्र आहे तसेच सदर निर्वाणीकरणाचे क्षेत्र व भारतरत्न डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा स्मारकाची जागा ही निर्वाणीकरण झालेल्या क्षेत्राशी मेळात येत आहे त्यामुळे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा स्मारकाची जागे संदर्भातला तिढा सुटलेला आहे त्यामुळे पालकमंत्री राधाकृष्ण विखे
पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी जागा देण्यासाठी सांगतो असे जाहीर करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळ्याचे काम लवकरच चालू करतो असे जाहीर केले तसेच डॉ बाबासाहेब
आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा होण्या संदर्भात केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांनी जिल्हाधिकारी यांना फोन करून तसेच लेखी आदेश केला आहे त्याच बरोबर मा. खासदार सुजय विखे पाटील यांचा देखील श्रीरामपूरवर लक्ष असून छत्रपती शिवाजी महाराजांचा
अश्वारूढ पुतळा श्रीरामपूर शहरामध्ये परवानगी मिळाली तसेच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा श्रीरामपूर शहरात उभारण्यासाठी काळजीपूर्वक लक्ष असून त्यामुळे बाबासाहेबांचा आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यास काहीच
अडचण राहिलेली नाही त्यामुळे आंबेडकरी अनुयायांना कोणत्याही क्षणी गोड बातमी मिळेल असा विश्वास भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन तसेच रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात विभागीय जिल्हाप्रमुख
भीमराज बागुल सुनील शिरसाठ सुरेश जगताप राजू गायकवाड विजय पवार सौ.रमादेवी धीवर मनोज काळे मोहन आव्हाड रितेश एडके अंतोन शेळके चरण त्रिभुवन संदीप पवार संजय बोरगे राजू मगर विशाल सुरडकर हितेश पवार मोजेस चक्रनारायण पी.एस. निकम
अशोक दिवे सुनील मगर मच्छिंद्र ढोकणे वैभव पंडित प्रकाश अहिरे अनिल बागुल किशोर ठोकळ लक्ष्मण मोहन रॉकी लोंढे मिलिंद धीवर निलेश भालेराव कैलास ठोंबरे राजू खरात गोरख आढाव अमोल काळे फिरोज पठाण अल्ताफ शेख अंबादास निकाळजे प्रदीप गायकवाड रवी अण्णा गायकवाड अशोक बागुल संतोष मोकळ सुरेश कांबळे संजय रूपटक्के दादासाहेब बनकर सुगंधराव इंगळे विठ्ठल गालफाडे अण्णासाहेब झिने अरुण खंडीझोड कचरू साबळे डीएल भोंगळे वसंत साळवे अशोक पांडागळे आदींनी व्यक्त केला.