नाशिक दिनकर गायकवाड इगतपुरी येथील जोगेश्वरी
परिसरात उमंग हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावर हॉटेलचे काम सुरू होते. त्यावेळी एका तरुणाचा डोक्यात हातोडी मारून खून झाल्याची घटना घडली.
प्रद्युम्न रामधनी चव्हाण (वय ३४, रा. हसवर, जि. आंबेडकरनगर, उत्तर प्रदेश) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे.त्याच्या डोक्यावर, कपाळावर आणि चेहऱ्यावर लोखंडी हातोडीने जोरदार वार केल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.घटनेनंतर त्याचा भाऊ रणजीत रामधनी चव्हाण याने इगतपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या हत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे.घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर, पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव व पोलीस उपनिरीक्षक कांचन भोजने यांनी घटनास्थळी पथकासह जाऊन पंचनामा केला.इगतपुरी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून संशयित आरोपी जनकराम चव्हाण याला अटक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक करीत आहे.