मुंबई सिटीलाईन न्यूज नेटवर्क कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर विविध प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामीण रस्ते विकास कंत्राटी कर्मचारी संघटनेचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष रामदास बर्डे हे आझाद मैदान येथे उपोषण करत आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ह्यांनी त्यांची भेट घेऊन विचारपूस केली.ह्यावेळी त्यांच्या कुटुंबियां समवेत संवाद साधताना शिवसेना त्यांच्या लढ्यात पूर्णपणे सोबत असल्याचा विश्वास दिला.तसेच बर्डे ह्यांना उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले. ह्यावेळी शिवसेना नेते, विधानपरिषद विरोधी पक्षनेते, आमदार अंबादास दानवे उपस्थित होते.
