डीव्हीजी ग्रुपचे हणमंतराव गायकवाड यांनी दिली आमदार विश्वजीत कदम यांना सदिच्छा भेट

Cityline Media
0
पुणे सिटीलाईन न्यूज नेटवर्क भारती भवन पुणे येथे डीव्हीजी ग्रुपचे प्रमुख हणमंतराव गायकवाड यांनी आमदार विश्वजीत कदम यांना सदिच्छा भेट दिली असता त्यांचे स्वागत आणि सत्कार करण्यात आला.
बीव्हीजी ग्रुप हा देशातील एक अग्रगण्य सेवा-उद्योग समूह असून स्वच्छता, हेल्थकेअर, सुरक्षा सेवा यासह हरित ऊर्जा यांसारख्या क्षेत्रात त्यांनी भरीव कार्य केले आहे. केवळ देश नाही तर जगभरात हा ग्रुप पोहोचला आहे. मराठमोळे व्यक्तिमत्त्व असणाऱ्या. हणमंतराव गायकवाड यांनी ग्रामीण भागातून शहराकडे झेप घेत, कठोर परिश्रम आणि दूरदृष्टीच्या बळावर उद्योजकतेचे अनोखे उदाहरण निर्माण केले आहे. 

सुमारे १ लाखहुन अधिक लोकांसाठी प्रत्यक्षरित्या रोजगाराच्या संधी निर्माण करीत २० हजारहून अधिक लोकांसाठी अप्रत्यक्षरीत्या उपजीविकेच्या संधी त्यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत, याचे निश्चितच कौतुक वाटते. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार आखत असलेल्या विविध योजना व उपाययोजनामध्ये ते मोलाची भूमिका बजावत आहेत. कॅन्सर, यकृत विकार, मोतीबिंदू, हृदयविकार, संधिवात इ. आजारांसाठी परवडणाऱ्या आरोग्यसेवेच्या दृष्टीने पारंपरिक उपचारपद्धती बरोबरच वनस्पतीजन्य औषधांच्या संशोधनावर देखील त्यांच्याकडून काम सुरू आहे. भेटीदरम्यान शिक्षण, तरुणांच्या सक्षमीकरणासाठी उद्योगसंधी आणि ग्रामीण भागातील रोजगार निर्मिती या विषयांवर त्यांच्याशी चर्चा झाली असे आमदार विश्वजीत कदम यांनी सांगितले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!