चाकण प्रतिनिधी बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील हातोला येथील अशोक शहादेव आघाव यांच्या चाकण औद्योगिक वसाहती मधीर शेवाळे,आघाव अँड कंपनी या चौथ्या फर्मच्या उद्घाटन समारंभ विविध मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच पार पडला पडला.
बीड जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातील हातोला सारख्या ग्रामीण भागामधून येत पुणे या ठिकाणी शिक्षण घेऊन अकाउंटिंग क्षेत्रामध्ये करिअर करायचे हे मनाशी बाळगत चार्टर्ड अकाउंटंट परीक्षा उत्तीर्ण होत सुरुवातीला वाकड,धायरी व आता नव्याने चाकण या ठिकाणी सुरु असलेल्या व्यवसायाच्या चौथ्या फर्मच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी अनेकांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.
आष्टी तालुक्यात संत वामनभाऊ व संत भगवान बाबा यांचा शिक्षणाचा विचार जोपसल्याने या भागात शैक्षणिक बाबतीत लक्ष दिल्याने वेगळी क्रांती झाली असे म्हणणे वावगे नसावे, याचे हेच उदाहरण आहे.
हातोला येथील.शहादेव आघाव यांनी शेती व ऊसतोडणीचे काम करत मुलांना हातोला येथील येथे जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक व माध्यमिक शिक्षण देत महाविद्यालयीन शिक्षणाकरीता मुलांना पुणे या ठिकाणी प्रवेश दिला.त्या ठिकाणी अशोक आघाव यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून सी.ए.ची परीक्षा उत्तीर्ण करून,याच व्यवसायात पदार्पण केले. त्यांच्या यशाचा हा प्रवास यापेक्षाही पुढे जात खूप मोठा व्हावा ही सदिच्छा यावेळी व्यक्त केली.
ग्रामीण भागातून आलेल्या मराठमोळ्या युवकांनी अशोक आगाव यांच्याकडून प्रेरणा घेत नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी पदार्पण केले पाहिजे असे मत यावेळी बोलताना अनेकांनी व्यक्त केले.
यावेळी बी.व्ही.जी. कंपनीचे श्री.गायकवाड ,स्टोरी डॉट कॉम चॅनलचे विशाल बडे यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी यांच्या उपस्थित हा समारंभ पार पडला