बीड प्नतिनिधी येथील अमृत लॉन्स मध्ये सावता परिषदेच्या विस्तारीत प्रदेश कार्यकारीणी बैठक उत्साहात पार पडली या बैठकीच्या शुभारंभ प्रसंगी सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष. कल्याणराव आखाडे उपस्थित होते यावेळी त्यांनी त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.सावता परिषदेच्या संघटनात्मक बांधणीमध्ये कल्याणराव आखाडे यांचे मोठे योगदान आहे.
मागील १८ वर्षांपासून सावता परिषदेची संघटनात्मक बांधणी टिकवून ठेवण्याचे दिव्य काम कल्याणराव आखाडे यांनी केले आहे.समाजाच्या प्रश्नांची त्यांना जाण असून हे प्रश्न वरिष्ठ पातळीवर मांडून ते सोडविण्यासाठी प्रशासकीय पातळीवर त्यांचेकडून सातत्याने प्रयत्न होत आहेत. खऱ्या अर्थाने आता सावता परिषदेच्या कार्यकर्त्याला सत्तेत वाटा मिळण्याची वेळ आली आहे. लवकरच होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेत सावता परिषदेच्या कार्यकर्त्यांना सन्मानाने सत्तेचा वाटा मिळण्यासाठी ही संघटना जोमाने काम करेल असा विश्वास या निमित्ताने व्यक्त केला.
कार्यक्रमाला सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे,प्रदेश प्रभारी मयुर वैद्य, प्रदेशाध्यक्ष गणेश दळवी,प्रदेश कार्याध्यक्ष संतोष राजगुरु, पांडुरंग कोठाळे,युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गाडेकर, कार्याध्यक्ष स्वप्नील खोदरे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष सौ.मनिषा सोनमाळी, कार्याध्यक्षा सौ.संगीता खुणे, प्रधान महासचिव डॉ.राजीव काळे, जिल्हाध्यक्ष किशोर राऊत,गेवराईचे तालुकाध्यक्ष दादासाहेब चौधरी यांच्यासह राज्यभरातून आलेले सावता परिषदेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.